बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असतात. ते सतत चाहत्यांशी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. राज कुंद्राने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात हे दोघे जण “टायटॅनिक’मधील रोज-जॅकच्या अवतारात दिसत आहे.
View this post on Instagram
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. हा एक मोर्फ व्हिडिओ आहे, ज्यात शिल्पा आणि राज हे “टायटॅनिक’मधील रोज आणि जॅकच्या भूमिकेत दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत राजने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अखेर टायटॅनिक जहाजावर एक पंजाबी कपल असल्याचे स्पष्ट झाले आहे. मी माझे म्हणणे येथेच पूर्ण करतो. हॅप्पी संडे.’
View this post on Instagram
या 14 सेकेंदाच्या व्हिडिओमध्ये “टायटॅनिक’ मधील तो सीन दाखविण्यात आला आहे, जेव्हा रोजही जॅकसोबत पार्टीत जाते आणि डान्स करते. परंतु या व्हिडिओत त्यांनी पंजाबी तडका दाखविला आहे. यात ते दोघे “लॉंग लाची’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावर असंख्य चाहत्यांनी कमेंट शेअर केल्या आहेत.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास शिल्पा लवकर स्क्रीन शेअर करत कमबॅक करणार आहे. ती शब्बीर खानच्या आगामी “निकम्मा’मध्ये झळकणार आहे. यात तिच्यासोबत अभिमन्यू दासानी आणि शिर्ले सेतिया मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय शिल्पा ही “हंगामा-2’मध्येही दिसणार आहे. यात परेश रावल, मीजान आणि प्रनीता सुभाष काम करणार आहे.
View this post on Instagram