मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
प्रतिभा पवार यांच्यासोबत शरद पवार हे देखील रुग्णालयात दाखल झाले आहेत. एका वृत्तसंस्थेने याबाबतची बातमी दिली आहे. प्रतिभा पवार यांच्यावर कोणत्या आजारासाठी शस्त्रक्रिया होणार आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Maharashtra | NCP chief Sharad Pawar’s wife Pratibha Pawar admitted to Mumbai’s Breach Candy Hospital: She will undergo surgery at Breach Candy Hospital, NCP President Sharad Pawar has reached the hospital: NCP
— ANI (@ANI) July 14, 2023
प्रतिभा पवार या राजकारणापासून दूर असल्या तरी त्या अनेकदा शरद पवार यांच्या ठराविक कार्यक्रमांना उपस्थित राहत असल्याचे पाहायला मिळत होते. नुकतंच शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी देखील प्रतिभा पवार उपस्थित होत्या.