नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाला एकत्रित आणण्यासाठी ब्रेकफास्ट डिप्लोमासीचा अवलंब केला होता. तर दुसरीकडे देशाच्या राजकारणात एक मोठी भेट आज पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची दिल्लीत झाली. या संदर्भात शरद पवार यांनी ट्विट केलं आहे.
शरद पवार यांनी ट्विटमध्ये अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीचं कारण नमूद केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते. मात्र गेल्या काही दिवसांत शरद पवारांनी घेतलेल्या राजकीय भेटी मागे राजकीय संदर्भ असल्याचे तर्क महाराष्ट्रात काढले जात आहेत.
Had a brief meeting with Union Co-operation Minister Shri Amit Shah in New Delhi today along with Shri Jaiprakash Dandegaonkar,President of NFCSF (National Federation of Cooperative Sugar Factories Ltd) & Prakash Naiknavre to discuss issues faced by the sugar co-operative sector. pic.twitter.com/4jroaBrsGs
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 3, 2021
शरद पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं की, देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सर्वप्रथम मी अमित शहा यांचे अभिनंदन केले. या भेटीदरम्यान, आम्ही देशातील साखर उद्योगाची परिस्थिती आणि साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा केल्याचे शरद पवारांनी नमूद केले आहे. यावेळी एनएफसीएसएफचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, प्रकाश नाईकनवरे होते. असंही ट्विटमध्ये म्हटलं.