नवी दिल्ली – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
पवार यांनी सोमवारी संध्याकाळी वकील अभिषेक जेबराज यांच्यामार्फत वैयक्तिक स्वरूपात याचिका दाखल करून हे आव्हान दिले आहे. त्यांच्या आधी, अजित पवार गटाने अधिवक्ता अभिकल्प प्रताप सिंग यांच्यामार्फत कॅव्हेट दाखल केले होते.
त्यामुळे पवार गटाला तातडीने तेथे केाणताही दिलासा मिळू शकला नाही. ६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी आहे,असा निर्णय दिला होता. तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्हही प्रदान करण्यात आले आहे.