Shiv Kamgar Sena – शिव कामगार सेनेच्या पुणे शहर प्रमुखपदावर शंकर संगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातील शिवसेना भवन येथे शिव कामगार सेनेचे अध्यक्ष सुधीर कुरुमकर यांच्या हस्ते संगम यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
संगम यांनी यापूर्वी विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली असून सध्या त्यांच्यावर शिवसेना पुणे शहर समन्वयक पदाची देखील जबाबदारी आहे.