‘लागीर झालं जी’ मालिकेतील अभिनेता नितीश चव्हाण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस

Nitish Chavan New Serial| झी मराठी वाहिनीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील अभिनेता नितीश चव्हाण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेत तो पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे फक्त पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते.
चार बहिणींचा सांभाळ करणारा, बहिणींना आईची माया देणारा असा हा भाऊ ‘लाखात एक आमचा दादा ‘मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यातील भावाची भूमिका कोण साकारणार हे सांगण्यात आले नव्हते. आता अखेर या मालिकेत लोकप्रिय अभिनेता नितीश चव्हाण मुख्य भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘लागीर झालं जी’ मालिकेतील अज्याच्या भूमिकेनंतर नितीश चव्हाण पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहे. या मालिकेच्या प्रोमोत चहुबाजुंनी भंडाऱ्याची उधळण होत आहे. नितिश खाली लोटांगण घालून खंडोबाला नमस्कार करतो. पुढे तो’सदानंदाचा येळकोट येळकोट’ म्हणत नितिश खंडोबाचा जागर करताना दिसतो. Nitish Chavan New Serial|
View this post on Instagram
दरम्यान, या मालिकेचं लेखन स्वप्नील चव्हाण आणि विशाल कदम यांनी तर मालिकेचे दिग्दर्शक किरण दळवी यांनी केले आहे. ‘वज्र प्रोडक्शन’ या मालिकेची निर्मिती करणार आहेत. ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लाखात एक आमचा दादा’ मालिकेची निर्मिती अभिनेत्री श्वेता शिंदे करत आहे. यापूर्वी तिने ‘लागिरं झालं जी’ आणि ‘देवमाणूस’ मालिकेची देखील निर्मिती केली आहे.
यापूर्वी ‘लागीर झालं जी’ मालिकेत भारतीय सीमेवर लढणारे फौजी आणि त्यांच्या कुटुंबाची हृदयस्पर्शी कथा दाखवण्यात आली होती. मालिकेतील शितली आणि आज्याच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. यानंतर आता नितीशला नव्या मालिकेत पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक झाले आहेत.
हेही वाचा:
राहुल गांधी स्मृती इराणींविरोधात अमेठीतून का लढणार नाहीत? अशोक गेहलोत यांनी सांगितलं कारण





