मुंबई – अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. कामासोबतच सारा आपल्या चाहत्यांना शूटिंग दरम्यानच्या पडद्यामागच्या गोष्टी देखील शेअर करत असते. साराचा असाच एक लूक सध्या चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात ती अगदी सर्वसामान्यांच्या रोजच्या लुकमध्ये दिसत आहे.
कानात झुमके अंगावर साधी साडी आणि समोर शेत या ठसकेबाज लूकमध्ये साराला पाहण्याची मजा काही औरच आहे. साराने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेले हे फोटो चाहत्यांना चांगलेच आवडत आहेत. साराने शेअर केलेल्या चारही फोटोजमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. पहिल्या दोन फोटोमध्ये ती एका खेडेगावातील बाजवर बसलेली दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये साराने शेता समोर तोंड करत बँक साईड पोज फोटो शेअर केला आहे. तर शेवटच्या फोटोमध्ये सारा तिच्या इतर छोट्या मोठ्या सहकाऱ्यांसह बाजवर बसलेली दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार साराचा हा नवीन अंदाज लक्ष्मण उटेकर यांच्या अंटायटल्ड चित्रपटातील आहे. यामध्ये सारा अभिनेता विकी कौशलसोबत दिसणार आहे. साराच्या हा देसी लूक चाहत्यांना मात्र प्रचंड आवडलाय. नेहमी बोल्ड आणि हॉट अंदाजात दिसणाऱ्या साराला यावेळी देसी स्टाईलमध्ये पाहून अनेकांनी तिचे कौतुक करत जोरदार कमेंट केल्या आहेत.