मुंबई – मनसे कार्यकर्त्यांनी सुरुवाती पासूनच भारतात काम करणाऱ्या विशेषत: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांविषयी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) November 16, 2022
याआधी पुलवामा याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकार आणि गायकांना भारतात काम करण्याविषयी विरोध केला होता. आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी पुन्हा एकदा या विषयावर ट्वीट करत इशारा दिला आहे.
अमेय खोपकर यांनी ट्विट केले आहे की,’बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. ही नीच प्रवृत्ती वेळोवेळी ठेचावीच लागते, म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील.’ असं म्हणत त्यांनी इशारा दिला आहे. आता पुन्हा एकदा मनसेकडून असाच इशारा देण्यात आल्याने बॉलिवूडविरोधात मनसेचे ‘खळ्ळखट्याक’ पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.