मुंबई – अभिनेत्री शहनाज गिल जिथे जाते तिथे सिद्धार्थ शुक्ला तिच्यासोबत असतो. सिद्धार्थ शुक्ला या जगाचा निरोप घेऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. पण आजही तो शहनाजच्या आसपास आहे. कधी अभिनेत्रीच्या हृदयात तर कधी भावाच्या हातावरील टॅटूमधून दिसत असतो. मंगळवारी संध्याकाळी शहनाज गिल तिचा भाऊ शाहबाजसोबत मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आली होती.
View this post on Instagram
गणपती बाप्पाच्या भेटीदरम्यान शहनाज गिलसोबत भाऊ शाहबाज, तसेच सिद्धार्थ शुक्लाही होता. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शाहबाजने त्याच्या हातावर सिद्धचा चेहरा गोंदवून घेतला होता. असा सिद्धार्थ शुक्ला शहबाजच्या आयुष्याचा तसेच त्याच्या शरीराचा कायमचा भाग बनलाय.
लालबागच्या राजाच्या भेटीदरम्यान पापाराझींची नजर शाहबाजच्या या टॅटूवर पडली. शहनाज गिल आणि शाहबाज बदेशाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये शहनाज पिवळ्या रंगाच्या सुंदर सूट आणि पलाझोमध्ये दिसत आहे. शहनाजच्या सूटवर एक सुंदर डिझाईन आहे. हातात चांदीच्या बांगड्या, कानात मोठे झुमके घालून शहनाज खूपच सुंदर दिसत आहे. त्याने कपाळावर एक काळा ठिपकाही लावला आहे.
View this post on Instagram
शाहबाजचा लूक खूपच कॅज्युअल होता. पांढऱ्या टी-शर्टसोबत त्याने क्रीम कलरची पॅन्ट घातली होती. शहनाज आणि शाहबाजचा लूक खूप पसंत केला जात आहे. अनेक चाहत्यांचे लक्ष शहनाजच्या नोज पिनकडे गेले आहे. या लूकमध्ये शहनाज खूपच क्यूट दिसत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. पिवळा रंग शहनाजला खूप शोभत असल्याचे अनेक चाहत्यांनी सांगितले.
शहनाज गिल सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. शहनाज सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ती संजय दत्तसोबत त्याच्या अमेरिका दौऱ्यावरही गेली होती.
शहनाज गिलला बिग बॉस 13 मधून प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये तिची अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत मैत्री होती. पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 2021 मध्ये सिद्धार्थच्या अचानक जाण्याने शहनाज गिल खूपच तुटली होती.