मुंबई – अभिनेत्री शहनाज गिलचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी शहनाजने गायलेले गाणे तर कधी तिची गोंडस शैली लोकांना आवडते. आता पुन्हा एकदा शहनाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती गुरू रंधवासोबत दिवाळी पार्टीत मस्ती करताना दिसत आहे.
बॉलिवूडमध्ये सध्या दिवाळीची पार्टी सुरू आहे. अशीच एक पार्टी रविवारी रात्री कृष्ण कुमार यांनी आयोजित केली होती. या पार्टीत अनेक सेलेब्स पोहोचले होते. या पार्टीत शहनाज गिल आणि गुरु रंधावाही आले होते. यावेळी दोघांनी खूप धमाल केली.
पार्टीचा एक व्हिडिओ गुरु रंधावाने त्याच्या सोशल अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गुरु रंधावा आणि शहनाज ‘ओ मखना…’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघांची बॉन्डिंग दिसत आहे. व्हिडिओमध्ये शहनाज गुरूला डान्स स्टेप्स शिकवताना दिसत आहे. दोघांची ही स्टाइल सोशल मीडियावर खूप पसंत केली जात आहे. शहनाज गिलने पार्टीसाठी फ्लोरल लेहेंगासह भारी दागिने कॅरी केले होते.