नवी दिल्ली – संपूर्ण देश आज ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यावेळी तिरंगा फडकवण्यात आले. यानंतर कर्तव्य पथावर भव्य परेड काढण्यात आली. यावर्षी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्लेद फताह अल-सिसी हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाच्या ४५ विमानांनी, भारतीय नौदलाचे एक आणि भारतीय लष्कराच्या चार हेलिकॉप्टरने आकाशात अप्रतिम शक्तिप्रदर्शन केले. भारताकडे नुकत्याच आलेल्या राफेलच्या शक्तिप्रदर्शनाची सर्वांनाच उत्सुकता होती. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राफेल जेटची ताकद संपूर्ण जगाने पाहिली.
The grand finale of the 74th Republic Day parade comprises 45 IAF aircraft, one from Indian Navy and four helicopters from Indian Army pic.twitter.com/2KwLqOYrZb
— ANI (@ANI) January 26, 2023
डेअरडेव्हिल्सने कर्तव्य पथावर केलेल्या कामगिरीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. बाइकवरील डेअरडेव्हिल्सने अप्रतिम कसरती यावेळी करून दाखवल्या आणि सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले.
Corps of Signals Dare Devils team mesmerises the audience with their performance at Kartavya Path on Republic Day pic.twitter.com/L9nHd3M8CA
— ANI (@ANI) January 26, 2023
कर्तव्य पथावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण
प्रजासत्ताक दिनानिमित्त संरक्षण मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयातर्फे कर्तव्यपथावर सांस्कृतिक सादरीकरण करण्यात आले. हे सादरीकरण स्त्री शक्तीवर केंद्रित होते.