मुंबई – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अभिनेत्री रवीना टंडनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनय विश्वातून पद्मश्री पुरस्कारासाठी रविनाची निवड करण्यात आली होती. यानंतर रवीनाने एक खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रवीना टंडनने, १९९१ मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर अनेक सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर त्या आपल्या खाजगी आयुष्यात व्यस्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. केजीएफ २ या चित्रपटामधून रवीनाने बऱ्याच कालावधीनांतर मोठ्या पडद्यावर दिमाखदार पदार्पण केले होते. रविनासह ‘आरआरआर’चे संगीतकार एमएम कीरावानी यांची देखील या पुरस्कारासाठी नवीद करण्यात आली. बुधवारी ही घोषणा करण्यात आली होती.यानंतर रवीनाने सर्वांचे आभार मानत एक पोस्ट शेअर केली आहे.
“मला या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. अजूनही मला पद्मश्री मिळाला आहे यावर विश्वास बसत नाही. मी केवळ बॉलिवूडच नाही तर त्यापलीकडे जाऊनही योगदान दिले आहे. त्याची दखल घेतल्याबद्दल भारत सरकारचे आभार. यासाठी मी माझे वडील रवी टंडन यांची ऋणी असून मला मार्गदर्शन केलेल्या प्रत्येकाचे आभार मानते.” अशा भावना रवीनने व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram