हर्षद मेहताची स्कॅम 1992 ही वेबसिरीज बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. यात काम करणारे कलाकार भरपूर होते. मात्र, त्यातील कोणीही स्टार नव्हते. अर्थात, स्टार असला की जे काही वलय प्राप्त होते ते या सिरीजमध्ये काम करणाऱ्या कोणालाही नव्हते. मात्र, या सिरीजला लोकांनी पसंत केले. डोक्यावर घेतले आणि तिचा अजूनही प्रचंड बोलबाला आहे.
View this post on Instagram
दहा की तेरा भागांच्या या सिरीजने प्रतीक गांधी नावाचा एक नवा कलाकार लोकांसमोर आणला. प्रतीकने यात बिग बुल हर्षद मेहताची भूमिका साकारली आहे. हर्षद मेहताचा अतिसामान्य ते बिग बुलपर्यंतचा प्रवास यात चितारण्यात आला आहे. हर्षद मेहताच्या त्या गाजलेल्या स्कॅमवर किंवा घोटाळ्यावर यातले नाट्य आधारित आहे.
View this post on Instagram
हा घोटाळा उघड झाल्यानंतर हर्षद मेहता तुरुंगात गेला. नंतर त्याचे निधनही झाले. मात्र त्याने स्टॉक मार्केटमध्ये जो धुमाकूळ घातला होता, तो कदाचित विस्मृतीत जाणारही नाही. या प्रकरणानंतरच यंत्रणेतील त्रुटी आणि पळवाटा आढळून आल्या होत्या व त्यानंतर त्याकडे लक्ष वेधले गेले.
View this post on Instagram
आता इतक्या वर्षांनी स्कॅम 1992 करण्यात आली व तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. करोना लॉकडाऊनच्या काळात जेथे भले भले निर्माते दिग्दर्शक उताने पडले तेथे स्कॅमने नेटवर प्रचंड गदारोळ केला आणि प्रतीक गांधी हे नाव सर्वमुखी झाले. त्याचे यातील संवादही अत्यंत टोकदार आणि जोरदार आहे.
View this post on Instagram
त्याच्या अभिनयाला दाद दिल्याशिवाय राहता येत नाही. असो. त्यामुळेच या वेबसिरीजने भारतीय वेबसिरीजच्या टॉपच्या यादीत अग्रस्थान पटकावले आहेच. मात्र आयएमडीबीने जगभरातील ज्या टॉपच्या शोंची यादी केली आहे, त्या 250 शोंच्या यादीतही स्कॅमचा समावेश झाला आहे.