प्रत्येकजण जास्तीचा आर्थिक नफा मिळावा म्हणून वेगवेळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. तुम्हालाही जर अधिक नफा मिळवायचा असेल तर एलआयसीच्या गृहनिर्माण वित्त मुदत ठेवीचा विचार तुम्ही करू शकता. LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड ने 12 एप्रिल 2023 पासून एकत्रित सार्वजनिक मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली असून 1 वर्ष ते 5 वर्षांच्या ठेवींवर 7.25% ते 7.75% पर्यंत व्याजदर देत आहे.
तसेच संचयी सार्वजनिक ठेवीवरील व्याजदरात वाढ केली असून 20 कोटी रुपये आणि त्याहून अधिक ठेवींसाठी ऑफर केले जात आहेत आणि योजनेअंतर्गत ठेवी 1 वर्ष, 18 महिने, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत. यामुळे तुम्हालाही या योजनेअंतर्गत गुंतवणुकीच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळू शकतो.
LIC HFL द्वारे नवीन दराने आकारण्यात आलेले व्याजदर
20 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी व्याजदर-
18 महिने ठेवीसाठी : 7.35%
1 वर्ष ठेवीसाठी : 7.25%
2 वर्षे ठेवीसाठी : 7.60%
3 वर्षे ठेवीसाठी : 7.75%
5 वर्षे ठेवीसाठी : 7.75%
20 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवींसाठी व्याजदर-
18 महिने ठेवीसाठी : 7.25%
1 वर्ष ठेवीसाठी : 7.25%
2 वर्षे ठेवीसाठी : 7.50%
3 वर्षे ठेवीसाठी : 7.75%
5 वर्षे ठेवीसाठी : 7.75%
20 कोटी रुपयांपर्यंतच्या गैर-संचयी सार्वजनिक ठेवींसाठी व्याजदर-
मासिक पर्याय-
18 महिन्यांच्या ठेवीसाठी : 7.10%
1 वर्षाच्या ठेवीसाठी : 7.00%
2 वर्षांच्या ठेवीसाठी : 7.35%
3 वर्षांच्या ठेवीसाठी : 7.50%
5 वर्षांच्या ठेवीसाठी : 7.50%
वार्षिक पर्याय-
18 महिन्यांसाठी वार्षिकी ठेवीसाठी : 7.35%
1 वर्षांच्या वार्षिकी ठेवीसाठी : 7.25%
2 वर्षांच्या वार्षिकी ठेवीसाठी : 7.60%
3 वर्षांच्या वार्षिकी ठेवीसाठी : 7.75%
5 वर्षांच्या वार्षिकी ठेवीसाठी : 7.75%