2018 मध्ये अनेक विक्रम मोडणाऱ्या जॉन अब्राहमच्या “सत्यमेव जयते’ चा सिक्वल जाहीर झाला आहे. यावेळी दिग्दर्शक मिलाप मिलन झवेरीच्या या चित्रपटात जॉनच्या बरोबर दिव्या खोसला कुमार दिसणार आहे. या चित्रपटात तिच्या एन्ट्रीसंदर्भात दिव्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच हा चित्रपट प्रदर्शनाची तारीखही तिने जाहीर केली आहे.
“सत्यमेव जयते 2′ 2 ऑक्टोबर 2020 रोजी रिलीज होणार आहे. 2018 मध्ये 15 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या सत्यमेव जयतेचे बजेट फक्त 45 कोटी रुपये होते. तर चित्रपटाची कमाई 88 कोटी रुपये होती. “सत्यमेव जयते’ मध्ये जॉन अब्राहम, मनोज बाजपेयी, आयशा शर्मा, अमृता खानविलकर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटात नोरा फतेहीचा आयटम नंबर “दिलबर….’ पब्लिकला खास आवडला होता.
आता या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा पूर्वीचाच थरार आणि राष्ट्रभक्तीचा तडका असणार आहे. यावेळी भ्रष्ट्राचार आणि राजकीय स्टंटबाजीचाही उपयोग कसा करून घेतला जाणार आहे, असे लवकरच समजेल. याशिवाय दिव्या खोसलाचा रोल नक्की काय असेल, हे देखील समजेल.