प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी माहिती
पुसेगाव – लाखो भाविकांचे श्रध्दांस्थान असलेल्या प. पू. श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त पुसेगाव येथे शुक्रवार दि. १२/०१/२०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता दहाव्या श्री सेवागिरी खुल्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील युवक, युवतींना शौकीनांना लोकनृत्य, रेकॉर्ड लोकनृत्य,पथनाट्य, समुह गीत, समुह गायन या वेळी सादरीकरण होणार असल्याची माहिती युवा महोत्सवाचे सचिव प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी माहिती दिली.
या युवा महोत्सवामुळे पारंपरिक लोककला व लोकसंस्कृतीचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे हा युवा महोत्सव म्हणजे कलाप्रेमी रसिकांसाठीचा आनंद सोहळा आहे.
सदर युवा महोत्सव सुरळीत पार पडणार असा बैठकीमध्ये विश्वास श्री.सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव यांनी व्यक्त केला.त्यावेळी श्री.बाळासाहेब जाधव उर्फ संतोष जाधव, यांनी ही युवामहोत्सवा विषयी काही मूलभूत सूचना आणि मार्गदर्शन केले.
यावेळी महोत्सवाचे सचिव प्रा. डॉ.संजय क्षीरसागर, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र भोसले यांनी महोत्सवाच्या कामी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .श्री. सेवागिरी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.बी. सावंत, विश्वस्त श्री.संतोष वाघ, सेवागिरी विद्यालयातील आणि कला व वाणिज्य महाविद्यालयाचे शिक्षक,शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.