सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतल्यानंतर 105 नागरिकांना मंगळवारी घरी सोडण्यात आले, तर 339 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 25, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 20, कोरेगाव, महाबळेश्वर प्रत्येकी दहा, वाई 41, खंडाळा एक, रायगाव येथील 36, पानमळेवाडी 107, दहिवडी 24, म्हसवड 15, पिंपोडे सहा व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 44, असे एकूण 339 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
करोनाची सद्य स्थिती
एकूण नमुने – 321602
एकूण बाधित – 57051
घरी सोडण्यात आलेले – 54454
मृत्यू – 1831
उपचारार्थ रुग्ण – 766
जिल्ह्यात 64 नागरिक करोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यात सोमवारी (दि. 8) जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 64 नागरिक करोनाबाधित झाले असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी मंगळवारी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत 1831 करोनाबळी झाले असून, बाधितांच्या आकड्याने 57 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात इतरत्र 11, सदरबझार, गडकर आळी प्रत्येकी दोन, गोडोली, मोरे कॉलनी प्रत्येकी एक, वर्ये दोन, एमआयडीसी एक, कराड तालुक्यात कराड शहर, वाघेरी प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात पाटण एक, खटाव तालुक्यात वडूज, मांडवे प्रत्येकी सहा, मायणी चार, निमसोड, कलेढोण प्रत्येकी तीन, पळसगाव दोन, अंबवडे, मोरावळे, वडगाव, कातरखटाव प्रत्येकी एक,
कोरेगाव तालुक्यात सासुर्वे, दहीगाव प्रत्येकी एक, माण तालुक्यात म्हसवड दोन, इतर तीन, बाहेरील जिल्ह्यातील पुणे, ठाणे, सांगली प्रत्येकी एक, असे 64 अहवाल पॉझिटिव्ह आले असून, सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सासुर्वे, ता. कोरेगाव येथील 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.