सातारा – सातारा येथील शासकीय विश्रामगृहात जय होलार सामाजिक सेवाभावी संस्थेची बैठक संस्थापक अध्यक्ष नंदकुमार नामदास, सचिव चद्रकांत नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश आवटे कार्याध्यक्ष प्रशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी शिखर शिंगणापूर येथील कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत, तसेच पुढील सामाजिक कार्याच्या अनुषंगाने चर्चा होवून सातारा जिल्ह्याच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार युवा जिल्हा उपाध्यक्ष किरण गोळे, प. महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख हनमंत खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ओंकार गेंजगे, नरेंद्र आवटे,पुणे जिल्हा युवा सचिव नवनाथ आवटे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिल आवटे, सहसचिव बाळासाहेब आवटे, युवा कार्याध्यक्ष प्रतीक नामदास, संपर्क प्रमुख सचिन कार्याध्यक्ष धर्मेंद्र नामदास, इदापुर अध्यक्ष सुदाम जाधव व होलार समाजाचे सदस्य उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रशांत खांडेकर यांनी केले. यावेळी होलार समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण कामी येणाऱ्या अडचणी, जातीचा दाखला काढणे किंवा शासकीय योजनांचा लाभ मिळणे याबाबत खेडोपाडी जावून शिबिर किंवा मेळावे आयोजित करावेत असे मत भारत जगताप यांनी मांडले.