सातारा – स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापनाखाली येथील जिल्हा परिषद मैदानावर सुरू झालेल्या छत्रपती कृषी, औद्योगिक, वाहन व पशू पक्षी महोत्सवातंर्गत आयोजित देशी- विदेशी जातींच्या श्वानांचा डॉग शो चांगलाच रंगला. या शो ला परिसरातील श्वान पालक आणि प्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्रीमंत छ. उदयनराजे भोसले मित्र समूह, जय सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्यातून सुरू असलेल्या छत्रपती महोत्सवामध्ये या डॉग शो ेदरम्यान, तब्बल 28 प्रकारचे श्वान सहभागी झाले. या डॉग शोमध्ये तज्ञ परिक्षक म्हणून पशुवैद्यक विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. विजय सावंत, महाबळेश्वर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास अधिकारी, डॉ. सुनील देशपांडे, डॉ. संदीप जाधव व सातारा पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल सुपने यांची प्रमुख उपस्थिती होती.
तब्बल सहा तास चाललेल्या या डॉग शोमध्ये विविध नामवंत श्वानांनी मालकांच्या इशाऱ्यानुसार प्रात्यक्षिके सादर केल्यानंतर राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते विजेत्या श्वान स्पर्धकांचा त्यांच्या मालकांसमवेत स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तज्ञ परीक्षकांसमावेत संयोजक सोमनाथ शेटे, रेखा शेटे, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, हेमलता भोसले यांच्या सह स्मार्ट एक्स्पो ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेत रणजीत शिर्के (विपेट), ओमकार गायकवाड (पग), प्रतिमा जाधव यांच्या (बसिक प्रो) तसेच विकास साळुंखे यांच्या मिनपिन, अरमान मुजावर यांच्या शिताझु, आदित्य जाधव यांच्या पिटबूल, तौशिक शेख यांच्या सायबेरियन हस्की, रोहित घाडगे यांच्या बेल्जियम शेपर्ड, आकाश बर्गे यांचा गोल्डन रेट्रिवर यासह महेश जाधव, गौरव शेडगे यांच्या बॉक्सर जातीच्या श्वानाने पारितोषिके प्राप्त केली. ओंकार किर्दत, शेखर उमापे, अजय शिंगे यांच्या कारवान जातीच्या श्वानांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. ग्रे हाऊंड जातीच्या श्वान प्रकारात अजित तावरे, प्रशांत जाधव, विष्णू साळुंखे यांच्या श्वांनांनी अनुक्रमे तीन क्रमांक मिळवून उत्तेजनार्थ पारितोषिक अनिकेत जाधव यांच्या श्वानाला देण्यात आले.
पामेरियन जातीच्या श्वान प्रकारात साहिल गोळे, निखिल रॉय आणि हेमंत निपाण यांच्या श्वानांना ड्रायव्हर जातीच्या श्वान प्रकारात स्वप्नील कारेकर, विकास कांबळे, मयूर होनराव यांच्या श्वानांना गौरवण्यात आले. जर्मन शेफर्ड प्रकारात निखिल कापसे, अनिकेत कदम, सुमीत देवरुखकर यांना पुरस्कार देण्यात आले. तर डॉबरमन जातीच्या प्रकारात निहाल काझी, प्रशांत शिंदे, हर्षद मोहिते तर ग्रेट डेन जातीच्या प्रकारात आकाश साळुंखे, अमेरिकन बुल जातीच्या प्रकारात गौरव जंगम, लोगो अर्जेंटिना जातीच्या श्वान प्रकारात वैभव चव्हाण, रॉटविलर प्रकारात आदित्य पवार आणि बी गेल प्रकारात कृष्णा शिंदे यांच्या श्वानांना गौरवण्यात आले. महोत्सवात दि. 21 व 22 ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता सरगम म्युझिक यांचा वाद्य संगीताचा कार्यक्रम होणार आहे.