नागठाणे – पाडळी-निनाम, ता. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माता पालक मेळावा व हळदी कुंकू समारंभ उत्साहात झाला. मेळाव्यास पाडळी परिसरातील पालक, माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या मेळाव्यात महिला व विद्यार्थी यांचे आरोग्य तसेच महिलासाठीचे खेळ घेण्यात आले. या बरोबरच विद्यालयातील शिक्षकांनी माता पालकांशी शाळेच्या पटसंख्येच्या वाढीसंदर्भात चर्चा केली.
यावेळी शाला व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. स्वाती ढाणे व सौ अमिता जाधव यांनी उपस्थित महिलांना वाण व बक्षीस वाटप केले,. पाडळी गावच्या पोलीस मित्र संघटनेच्या अध्यक्षा सौ. स्वाती ढाणे आणि पंचायत समिती सदस्या सौ. विजयाताई गुरव, पाडळी गावाच्या उपसरपंच सौ. प्रणाली ढाणे, पोलीस पाटील सौ. रुपाली गुरव उपस्थित होत्या.