सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) -गॅलेक्सी इंटरनेट कंपनीत गुंतवणूक करुन चांगला मोबादला मिळेल, असे आमिष दाखवून एका अपंग महिलेची 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात योगेश मोहन तोरडमल (रा. शिरढोण, ता. कोरेगाव, सध्या रा. मार्केटयार्ड कोरेगाव) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार महिला शिल्पा यशवंत बागल (वय 41, रा. गोवे, ता. सातारा) यांना गॅलेक्सी इंटरनेट कंपनीच्या नावे पैशाची गुंतवणूक करुन चांगला मोबादला मिळवून देतो असे आमिष योगेश तोरडमलने दाखवून वेळावेळी त्यांच्याकडून 20 लाख रुपयांची रक्कम घेतली. मे 2022 ते आजपर्यंत त्याला बागल यांनी पैसे दिले. त्यानंतर मोबदला व पैसे मागितले असता तोरडमल हेतूपूर्वक पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. तक्रारदार महिला अंध व अपंग असून त्यांनी दि. 1 रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.