सातारा – लंपी स्किनमुळे सोमवारी आणखी 17 जनावरांचा मृत्यू झाला असून आजअखेर 863 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 201 गावांमध्ये आजअखेर 11 हजार 90 गाय व 2 हजार 33 बैल अशा 13 हजार 123 जनावरांस लंम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे. नियमित औषधोपचाराने 7 हजार 907 जनावरे बरी झाली आहेत.
सोमवारी माण तालुक्यातील 5, खटाव तालुक्यातील 4, कराड तालुक्यातील 1, सातारा तालुक्यातील 2, खंडाळा तालुक्यातील 1, पाटण तालुक्यातील 1, कोरेगाव तालुक्यातील 2 व फलटण तालुक्यातील 1 अशा 17 जनावरांचा मृत्यू झाला. सध्या 4 हजार 353 जनावरांवर औषधोपचार सुरु असल्याची माहिती पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.