खळबळजनक ! सर्पमित्राने कोविड सेंटरच्या परिसरात सोडले विषारी साप

बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एका सर्पमित्राने चक्क उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरच्या परिसरात विषारी साप आणून सोडले. या प्रकरणाची चौकशी करण्यात येते आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरच्या आजुबाजुच्या परिसरात एका सर्पमित्राने पकडून आणलेले 6 ते 7 विषारी साप सोडल्याने परिसरात आणि कोविड रुग्णालयाच भितीचे वातावरण पसरले आहे. शहरात कुठेही साप आढळला की, त्याला पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलावले जाते. सर्पमित्र म्हणजे, सापांचा मित्र. मानवी वस्तीत कुठेही साप आढळला तर या व्यक्ती तो साप पकडून त्याला सुखरुप जंगलात सोडतात. पण बुलढाण्यातील सर्पमित्राने केलेले कृत्य विशिप्तपणाचे आहे. अक्रम हे त्याचे नाव असून त्याने असे का केले याची चौकशी केली जाते आहे.

 रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी या सर्पमित्राला हे कृत्य करताना पाहिले आणि त्याला अडवण्याता प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांकडून अडवणूक झाल्यामुळे या सर्पमित्राने काही साप पकडून नेले. या कोविड सेंटर परिसरात अत्यंत घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच अनेक प्रजातीचे साप आढळून येतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.