आळंदी- कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी| लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि || या अभंगाप्रमाणे वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी सावता माळी यांना आपल्या मळ्यातच विठ्ठल दिसत होता. आपल्या कामातच देव शोधण्याचा संदेश त्यांनी दिला आहे. निःस्वार्थ भावाने कर्म करत रहा देव नक्की भेट देतो, असे प्रतिपादन ह. भ. प. बाळासाहेब महाराज थिटे यांनी केले.
संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त श्री संत सावतामाळी ग्रुपतर्फे योगी चांगदेव महाराज विश्रांतीवड परिसरात हरिकीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कीर्तनात थिटे महाराज यांनी संत सावतामाळी यांचे चरित्र वर्णन केले त्यानंतर शेकडो भाविकांना महाप्रसाद अन्नदान वाटप करून पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी हनुमंत माळी, सुधीर वाघमारे, विशाल देशमुख, भालचंद्र माळी, पवन गवळी, दादा पांचाळ, श्रीराम पवळ, गणेश गवळी, अरविंद सुरवसे, ज्ञानेश्वर माळी, ज्ञानेश्वर पगडे, शिवाजी धुळगंड, गोविंद गवळी, शिवाजी जावेर, गणेश मोटकर, उमेश पांचाळ आदी मंडळींनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले.