Sanskruti Balgude : अभिनेत्री संस्कृती बालगुडेने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिच्या ‘पिंजरा’ या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. यातील तिची आनंदी नावाची भूमिका विशेष गाजली होती. ती सोशल मीडियावर देखील सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते. आपल्या अभिनयाबरोबर आपल्या लूक्समुळे रसिकांची मनं जिंकलेली मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही हटके फोटो शेअर केले असून, यात संस्कृती खूपच हॉट दिसत आहे. संस्कृती बालगुडेने शेअर केलेल्या फोटोमध्ये लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यात ती फारच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. संस्कृतीच्या फॅन्सकडून तिच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
Instagram पर यह पोस्ट देखें
दरम्यान, संस्कृती याआधी ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय सांगतो ऐका, निवडुंग, शिव्या, फ्रेंडशिप, भय या चित्रपटातही संस्कृती झळकली होती. काळे धंदे या वेबसीरिजमध्येही संस्कृती बालगुडेने काम केलं आहे. ज्या सीरिजची चांगलीच चर्चा झाली.
याशिवाय संस्कृती ‘आईच्या गावात मराठीत बोल’ चित्रपटात देखील दिसणार आहे. या सिनेमात 3 इडियट्समधील चतुर म्हणजेच ओमी वैद्य देखील मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करणार आहे. येत्या 19 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.