मुंबई – टीव्ही अभिनेत्री संजीदा शेखने ‘क्या होगा निम्मो का’, ‘कयामत’ आणि ‘इश्क का रंग सफेद’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. संजीदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलीच सक्रिय असते. 2022 मध्ये तिने अभिनेता आमिर अलीसोबत घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगी असून संजीदा आता एकटी मुलीचे संगोपन करते. मात्र घटस्फोटानंतर बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत तिच्या अफेअरची चर्चा सुरू झाली आहे.
संजीदा शेख बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच याड दोघांचे व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते दोघे इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जंगल सफारीचे काही फोटो शेअर करत आहेत. त्या फोटोंमधून नेटकऱ्यांनी साम्य शोधले आहेत. यावरून त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत अद्याप या दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एका मुलाखतीदरम्यान संजीदा शेखने हर्षवर्धन राणेसोबतच्या अफेअरच्या चर्चांबाबत भाष्य केले होते.
View this post on Instagram
View this post on Instagram
संजीदा म्हणाली की, “मला अशा बातम्यांची हरकत नाही. हे पत्रकारांचे काम आहे. रोजच्या बातम्या आणि मथळे देण्याचे त्यांचे लक्ष्य असते, जे ते अशा बातम्या तयार करून पूर्ण करतात. म्हणूनच त्याचे काम आहे आणि माझे काम चित्रपट करणे आहे.याआधीही संजीदाने गॉसिप्सबाबत मला अजिबात फरक पडत नसल्याचे म्हंटले होते. संजीदा शेखने हर्षवर्धनसोबत ‘तैश’मध्ये काम केले आहे.