Entertainment News – तमिळ चित्रपटातील सुपरस्टार थलपती विजयच्या चित्रपट लियोची सर्वत्र चर्चा आहे. लोकेश कनगराज यांच्या डायरेक्शनमध्ये बनलेली एक्शन फिल्ममधून संजय दत्त तमिळ चित्रपटात डेब्यू करणार आहे. Leo Hindi Poster , Thalapathy Vijay , Devil Sanjay Dutt , Lokesh Kanagaraj Film,
संजय दत्त या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. लिओ चित्रपटाचे आतापर्यंत तमिल, तेलुगू, आणि इंग्रेजी वर्जनचे पोस्टर शेअर करण्यात आले होते.तर नुकताच आता लिओचे हिंदी पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या हिंदी पोस्टरमध्ये संजय दत्तची झलक दिसून येत आहे.
पोस्टरमध्ये विजय संतापून संजय दत्तच्या चेहऱ्याला पकडतो आहे. पोस्टरवर यासोबतच एक कोटेशन लिहिण्यात आले आहे. या पोस्टरला विजयने शांत रहा आणि रक्षसाचा सामना करा असे लिहीत शेअर केले आहे. सोशल मीडियावर लियोच्या पोस्टर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत या पोस्टरला १.६ मिलियन वेळा पाहण्यात आले आहे. पोस्टरवर जबरदस्त म्हणत चाहते रिएक्ट करत आहे. या पोस्टरने अल्लू अर्जुन च्या ‘पुष्पा 2’ च्या पोस्टरचा रेकॉर्ड तोडला आहे. Leo Hindi Poster , Thalapathy Vijay , Devil Sanjay Dutt , Lokesh Kanagaraj Film,
लियोमध्ये थलपति विजय आणि संजय दत्त व्यतिरिक्त अलावा तृशा, मैसस्किन, गौतम वासुदेव मेनन, अनुराग कश्यप, अर्जुन तसेच मंसूर अली खान मुख्यभूमीकेत दिसणार आहे. ‘लिओ’ या वर्षी 19 ऑक्टोबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘जवान’मध्ये कॅमिओ भूमिकेत दिसला संजय दत्त
संजय दत्तबद्दल सांगायचे तर, तो अलीकडेच शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात कॅमिओ भूमिके दिसला होता. दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलायचे झाले तर, याआधी प्रशांत नीलच्या ‘KGF: चॅप्टर 2’ मध्ये अधीराची खलनायकाची भूमिका साकारूनही तो चर्चेत आला आहे. पुढे, त्याच्याकडे ‘बाप’ हा चित्रपट देखील आहे, ज्यामध्ये तो जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत दिसणार आहे. Leo Hindi Poster , Thalapathy Vijay , Devil Sanjay Dutt , Lokesh Kanagaraj Film,