नांदेड – बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या आणखी एका शूटरला जेरबंद करण्यात नांदेड पोलिसांना यश आले आहे. 5 एप्रिल 2022 रोजी संजय बियाणी यांच्या शारदानगर निवासस्थानासमोर दोघांनी गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली होती.(Sanjay Biyani murder case)
संजय बियाणी यांनी खंडणी न दिल्याने कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंह (Harvindar singh) उर्फ रिंदा याने त्यांची हत्या घडवल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.एसआयटीने (SIT) या प्रकरणात नांदेडमधून एकूण 17 जणांना अटक केली आहे.
गोळ्या झाडणारे दोघे फरार होते. गेल्या महिन्यात हत्याकांडातील प्रमुख शूटरला अटक केल होती. नांदेड पोलिसांनी (Nanded Police) चंदीगड तुरुंगातून मुख्य आरोपीला 11 सप्टेंबरला नांदेडला आणले होते. सध्या तो कारागृहात आहे.
त्यानंतर गुरुवारी दुसऱ्या शूटरचाही ताबा पोलिसांना मिळाला असून तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. पुढील तपास आता सुरू असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी सांगितले.