मुंबई – सानिया मिर्झाने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. WTA वेबसाइटशी बोलताना भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने सांगितले की, ‘फेब्रुवारीमध्ये दुबईत होणारी WTA 1000 स्पर्धा ही तिची शेवटची स्पर्धा असेल.’
सानिया पुढे म्हणाली की, ‘खरे सांगायचे तर मी ज्या प्रकारची व्यक्ती आहे, मला माझ्या अटींवर काम करायला आवडते. त्यामुळे मला दुखापतीमुळे बाहेर राहायचे नाही. म्हणूनच मी प्रशिक्षण घेत आहे. खार तर मला 2022 च्या शेवटी निवृत्त व्हायचे होते, परंतु कोपराच्या दुखापतीमुळे मी यूएस ओपनचा भाग होऊ शकली नाही.’ असेही तिने म्हटले आहे.
सानिया मिर्झाच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, या भारतीय टेनिस स्टारने तिच्या व्यावसायिक कारकिर्दीत 6 प्रमुख चॅम्पियनशिप जिंकल्या. सानिया मिर्झाने 3 वेळा दुहेरी आणि 3 वेळा मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया मिर्झा तिची कझाकिस्तानची जोडीदार अॅना डॅनिलियासोबत कोर्टवर हजेरी लावणार आहे. विशेष म्हणजे सानिया मिर्झा गेल्या जवळपास 10 वर्षांपासून दुबईत राहत आहे. सानिया मिर्झाचे दुबईत खूप चाहते आहेत. सानिया मिर्झा तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या टेनिस करिअरला अलविदा करणार आहे.