मुंबई – ‘लॉकअप’ या शोमध्ये दिसलेली पायल रोहतगी सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अलीकडेच हे संग्राम सिंह – पायल जोडपे रोहतगी विमानतळावर स्पॉट झाले. ती मुंबईहुन लग्नासाठी रवाना झाली आहे. पायल बिन्दास्त शैली आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. या दोघांनी लॉक अप या रिअॅलिटी शोमध्ये लग्नाची घोषणा केली होती.
9 जुलै होणार लग्न
पायल – संग्राम 9 जुलैला आग्रामध्ये सात फेरे घेणार आहे. यांच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेहंदी, संगीत आणि हळदी या दोघांच्या लग्नाचे कार्यक्रम 6 जुलैपासून आग्रा येथे सुरू होणार आहेत. दोघेही हिंदू परंपरेशी लग्न करणार आहेत.
जोडप्याचे 12 वर्षांपासून आहे रिलेशनशिप
पायल – संग्राम गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. रिअॅलिटी शो लॉकअपमध्ये दोघांनी आता लवकरात लवकर लग्न करणार असल्याची घोषणा केली होती.