सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून सोमवारी संध्याकाळपर्यंत 875 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 985 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 54, कराड उपजिल्हा रुग्णालय 26, फलटण उपजिल्हा रुग्णालय 46, कोरेगाव 82, वाई 141, खंडाळा 82, रायगाव 98, पानमळेवाडी 40, मायणी 53, महाबळेश्वर 30, पाटण 27, दहिवडी 64, तळमावले 35 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 207 अशा एकूण 985 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली.