Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या समांथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) बॉलीवूडमध्येही मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. समांथा कधी तिच्या चित्रपटामुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. याशिवाय सोशल मीडियाद्वारे देखील तिच्या नव्या प्रोजेक्टबाबत अथवा वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती शेअर करत असते. नुकतेच तिने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना निर्मिती क्षेत्रात पदार्पण केल्याची माहिती दिली आहे.
समंथा रुथ प्रभूने तिच्या नव्या प्रोडक्शन हाऊसची घोषणा केली आहे. समांथाने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. ट्रालाला मुव्हिंग पिक्चर्स असं समांथाच्या प्रोडक्शम हाऊसचं नाव असून तिने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. “माझ्या निर्मिती संस्थेची घोषणा करताना आनंद होत आहे. ट्रालाला मुव्हिंग पिक्चर्स…नवीन पिढीचे विचार आणि भावना असलेला कटेंट मांडणं हे ट्रालाला मुव्हिंग पिक्चर्सचं मुख्य उद्दिष्ट असेल. अर्थपूर्ण आणि युनिव्हर्सल कथा सांगणाऱ्या दिग्दर्शकांसाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध असेल,” असं तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी कमेंट करत समांथाला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, समांथा यापूर्वी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. तिने नागा चैतन्यशी 2017 मध्ये विवाह केला होता. परंतु, 2021 मध्ये घटस्फोट घेत त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या बातमीनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. याशिवाय समांथा मायटोसिस या आजारावर सध्या उपचार घेत आहे. त्यामुळे तिने काही वेळ अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचे सांगितले. नुकतेच ती ‘खुशी’ आणि ‘शांकुतलम’ या चित्रपटात पाहायला मिळाली होती.