Benjamin Netanyahu : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. गाझा पट्टीमध्ये इस्रायल सातत्याने हमसच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत आहे. त्यासाठी इस्रायल एआय टूल्सचा वापर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या सगळ्यात आता इस्रायलकडून हमासला शेवटचा इशारा देण्यात आला आहे. इस्रायलने हमासला आत्मसमर्पण करण्याचा पर्याय दिला आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला शेवटचा इशारा दिला आहे. त्यांनी यावेळी,”आता हमासचा अंत जवळ आला आहे.” असे म्हटले आहे. यापूर्वी नेतन्याहू यांनी, हे युद्ध अजूनही सुरू आहे आणि ही हमासच्या अंताची सुरुवात आहे,” असे म्हटले होते.
नेतन्याहू म्हणाले की, मी हमासच्या दहशतवाद्यांना सांगू इच्छितो. आता सर्व काही संपले आहे. सिनवारसाठी मरण्याची गरज नाही. शरणागती घ्या” असे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांत हमासच्या डझनभर दहशतवाद्यांनी आमच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. ते आपले शस्त्र खाली ठेवत आहेत आणि आपल्या शूर सैनिकांसमोर आत्मसमर्पण करत आहेत.” असे म्हटले आहे.
इस्रायलच्या धमकीनंतर हमासनेही प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलने सर्व अटी मान्य केल्या तरच आपण ओलीसांची सुटका करू,” असे हमासने म्हटले आहे. इस्रायलने त्याच्या अटी मान्य केल्या नाहीत तर एकही ओलीस जिवंत राहणार नाही. एवढेच नाही तर लष्कराने हमासच्या आत्मसमर्पणाचे पुरावे जाहीर केले नसून हमासने असे दावे फेटाळून लावले आहेत.
रविवारी नेतान्याहू यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी जवळपास 50 मिनिटे फोनवर चर्चा केली. हे युद्ध जानेवारीपर्यंत संपेल असे अमेरिकेने आधीच सांगितले आहे. मात्र, त्यासाठी कोणतीही मुदत निश्चित करण्यात आलेली नाही. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही युद्धाची अंतिम मुदत ठरवण्याचे काम इस्रायलचे असल्याचे म्हटले आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाबाबत मंगळवारी संयुक्त राष्ट्रात मतदान होऊ शकते.