मुंबई – मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सक्रिय असते. अनेक फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या सई स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे त्याच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड अनिश जोगसोबत गेला आहे. त्याचे फोटो तिने शेअर केलेले नाहीत. मात्र स्टोरीवरील फोटोंनी हा खुलासा झाला आहे.
सई आणि अनिश एकत्र स्पेनमध्ये गेले आहेत, असा अंदाज चाहत्यांकडून लावला जात आहे. सईने तिच्या स्टोरीवर स्पेनमधील फोटो आधीच पोस्ट केले होते. त्यानंतर अनिशने देखील स्पेनमधील काही फोटो शेअर केले आहेत. याशिवाय दोघांनीही एकच फोटो आपापल्या इंस्टाग्राम स्टोरीवर वेगवेगळ्या कॅप्शनसहीत शेअर केला आहे. त्यावरून ते दोघेही एकत्र असल्याची पोलखोल झाली आहे.
अद्याप या दोघांनी नात्याबाबत जाहीरपणे सांगितले नाही. मात्र अनेकदा सई त्याच्यासोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे या दोघांची चर्चा रंगलेली असते. अनिशने अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. सईने अनिशच्या ग्रलफ्रेंड, धुरळा,टाइम प्लिज अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.