मुंबई – स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वत्र तिरंगा फडकत असतानाच देशाची मान कायम अभिमानाने उंचावणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजानी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह सेहवाग, धोनी अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे. कोणत्या खेळाडूने आपल्या सोशल मीडियावरून नेमक्या काय शुभेच्छा दिल्या आहेत हे आपण आता पाहुयात.
‘हर घर तिरंगा’ या पंतप्रधानांच्या मोहिमेत सामील होत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने गाण्याच्या ओळी लिहीतानाचा आपला एक फोटो पोस्ट करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
टेनिस पटू सानिया मिर्झाने बॅग्राऊंडला तिरंगा असलेला आपला खेळतानाचा एक फोटो पोस्ट करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सायना नेहवालने देखील आपला एक पोस्ट करत स्वातंत्र्य इन साजराकेल आहे.
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा असे म्हणत हार्दिक पंड्याने देखील एक पोस्ट केली आहे.