पॅरिस – रशियन शहर सेंट पिटर्सबर्गकडे जाणारे व्यापारी जहाज फ्रान्सने ताब्यात घेतले. इंग्लिश कालव्यातून जाणारे हे जहाज फ्रान्सच्या नौदलाने हस्तक्षेप करून ताब्यात घेतले. त्यानंतर ते बौलोग्ने सुरमेर बंदरात नेण्यात आले.
युरोपीय महासंघाने लादलेल्या नव्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे फ्रान्सच्या नौदल अधिकाऱ्यांनी बीबीसी वृत्तवाहिनीला सांगितले.
127 मिटर लांबीच्या या मालवाहू जहाजातून मोटारींची वाहतूक करण्यात येत होती. युरोपीय महासंघाने लादलेले निर्बंध मोडून ही वाहतूक होत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. रशियाच्या फ्रान्समधील दुतावासाने या प्रकरणी फ्रान्स सरकारकडून स्पष्टीकरण मागावले आहे.