हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मुंडळ येथील एका शेतकऱ्यांच्या शेतात वाघ आला अशी माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली. ही घटना आज (दि. 15) घडली आहे. वाघ आला रे ‘वाघ आला रे,, पळापळा’ अशी बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि ग्रामस्थांनी वाघ बघण्यासाठी मोठी गर्दी केली.
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मुंडळ येथे वाघ आल्याच्या अफवेने चांगलीच तारांबळ उडालीय. मुंडळ येथील एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात वाघ लपलाय अशी माहिती एका शेतकऱ्याने दिली. ही अफवा वाऱ्यासारखी पसरताच वाघ पाहण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी शेतात गर्दी केली. एवढेच नव्हे तर सध्या घटनास्थळी पोलीस प्रशासन व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. वाघ पाहिला असल्याची अद्याप तरी पुष्टी प्रशासनाकडून करण्यात आली नाहीये.
वाघ नेमका कुठे लपला हे पाहण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना घेऊन त्या शेतात पाहणी करण्यासाठी गेले. त्या शेतकऱ्यांच्या शेतात पाऊल खुणा उमटले असून या पाऊलखुला नेमक्या वाघाच्याच आहेत का …? हे देखील अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या अफवेने शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन या वाघाला पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी झाडावर उभे राहून खडा पाहरा द्यायला सुरुवात केली आहे. सोबतच पोलीस प्रशासन व वन विभागाची देखील तारांबळ उडाली आहे.
आज कळमनुरी तालुक्यातील मुंडळ येथील गावाच्या शिवारात उसाच्या शेतात वाघ आल्याची अफवा पसरली होती. आम्ही वन विभागाच्या वतीने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी काहीच आढळून आले नाही आणि वाघ जर आला तर त्याला जीपीएस ट्रेक असतो. लगेच वन विभागाला कळते. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाघ आला नाही, असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.