Heilbronner Neckarcup Title 2024 : सुमित नागलने पटकावले विजेतेपद…

Heilbronner Neckarcup Title 2024 : सुमित नागलने रविवारी जर्मनीतील हेइलब्रॉन नेकरकप 2024 एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. पुरुष एकेरीच्या जागतिक क्रमवारीत 95व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय टेनिसपटूने दोन तास 22 मिनिटे चाललेल्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत 184व्या क्रमांकावर असलेल्या स्वित्झर्लंडच्या अलेक्झांडर रित्शर्डचा तीन सेटमध्ये 6-1, 6(5)-7(7), 6-3 असा पराभव केला.
NECKARCUP Champion 2024! 👏👏👏
🇮🇳 @nagalsumit clinches his 6th ATPChallenger career title following a 6-1 6-7 6-3 victory over Alexander Ritschard 🇨🇭
📹: @seventy4_studio#ATPChallenger #Heilbronn #NECKARCUP pic.twitter.com/5wclsogfzU
— NECKARCUP Heilbronn (@NeckarH) June 9, 2024
नागलचे हे कारकिर्दीतील सहावे एटीपी चॅलेंजर विजेतेपद आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीला घरच्या मैदानावर चेन्नई ओपनचे विजेतेपद पटकावल्यानंतर वर्षातील त्याचे दुसरे विजेतेपद आहे. सध्याचा सर्वोत्कृष्ट दर्जाचा भारतीय एकेरी खेळाडू 26 वर्षीय नागल याने 2023 पासून चार एटीपी चॅलेंजर खिताब जिंकले आहेत आणि हेलब्रॉनमधील विजय हे त्याचे क्ले टेनिस कोर्टवरील चौथे विजेतेपद होते.
French Open 2024 : कार्लोस अल्काराजने पटकावलं विजेतेपद, अटीतटीच्या सामन्यात अलेक्झांडरचा केला पराभव…
भारतीय टेनिसपटूने अलीकडेच फ्रेंच ओपनमध्ये भाग घेतला होता जिथे तो पहिल्या फेरीतच बाहेर पडला होता. हेइलब्रॉन नेकरकप 2024 च्या विजेतेपदामुळे नागलच्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्र होण्याच्या आशांना मोठा बळ मिळणार आहे.





