मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांचा आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच या चित्रपटाचे दिग्दर्शक करण जोहर यांनी 25 मे रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.
करणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एकामध्ये आलिया भट्टचा लूक तर दुसऱ्यामध्ये रणवीर सिंग त्याच्या हटके स्टाईलमध्ये दिसत आहे. रणबीर आणि आलियाच्या या लुक ला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून करण जोहर 7 वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करत आहे. चित्रपटामध्ये रणबीर, आलिया यांच्याबरोबरच धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी हे दिग्गज कलाकारही झळकणार आहे. हा चित्रपट येत्या 28 जुलै रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.