दैनंदिन जीवनामध्ये उपकरणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याचे गंभीर परिणाम आपल्या डोळ्यांवर दिसू लागले आहेत. मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीवर यावर सतत लक्ष ठेवल्याने डोळे कमी वयातच कमजोर होऊ लागले आहेत. त्यामुळे आजच्या काळात डोळ्यांकडे अधिक लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दलची ‘5’ नियमांबद्दल माहिती जाणून घेऊया.
1. तुमच्या डोळ्यांसाठी स्क्रीन टाइम सेट करा. फोन दिवसातून 1 ते 2 तास वापरला पाहिजे कारण जास्त मोबाईल वापरल्याने आपल्या डोळ्यांवर आणि मनावर खूप तणाव निर्माण होतो.
2. सनग्लासेस आणि टोपी घालण्याची सवय लावा. सनग्लासेस आणि टोपी हे हानिकारक अतिनील किरणांना रोखते ज्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो.
3. दिवसातून 30 मिनिटे डोळ्यांचा व्यायाम करा. ज्यामुळे काचबिंदूचा धोका 73% कमी होतो.
4. जीवनसत्त्वे ए, बी, सी, डी आणि ई, तसेच ओमेगा -3 च्या कमतरतेमुळे स्नायूंचा ऱ्हास आणि डोळ्यांना गंभीर नुकसान होण्याचा धोका वाढत असतो.
त्यामुळे गडद हिरव्या-लालसर पालेभाज्या आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध असलेले अन्न, जसे की ट्यूना, सॅल्मन आणि फ्लेक्ससीड यांचे सेवन करा ज्याचा तुमच्या डोळ्यांसाठी फायदा होईल.
5. दर 10 मिनिटांनी आपल्या डोळ्यांच्या पापण्या लुकलुकत रहा. जेणेकरून त्यांचे स्नेहन संपणार नाही आणि डोळ्यातील बुबुळाला कोरडेपणा येणार नाही.