मुंबई – आर माधवनच्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात माधवनने इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची कथा दाखवली. या चित्रपटाच्या समर्थनार्थ अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्टर्स शेअर केले आहेत. त्याचबरोबर आता या चित्रपटासाठी माधवनला साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी सन्मानित केले आहे. अलीकडेच रजनीकांत यांनी आर माधवन आणि नंबी नारायण यांची भेट घेतली. चित्रपटाच्या यशानंतर साऊथ सुपरस्टारने माधवन आणि नंबी नारायण यांचा गौरव केला. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
आर माधवनने सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये रजनीकांत माधवनला शाल घालतात, त्यानंतर माधवन रजनीकांतच्या पायाला स्पर्श करतो. दुसऱ्या व्हिडिओमध्ये रजनीकांत नंबी नारायणला शाल घालताना दिसत आहेत. यानंतर या प्रसंगाचे दोन सुंदर फोटोही दाखवण्यात आले आहेत, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पोस्टवर चाहते कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.
या पोस्टसोबत आर माधवनने एक सुंदर कॅप्शन दिले आहे, ज्यामध्ये त्याने रजनीकांत यांचे आभार मानले आहेत. रजनीकांत सर तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद, असे माधवनने लिहिले आहे. आर माधवनची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच पसंत केली जात आहे. चाहते या पोस्टवर कमेंट करून अभिनेते आणि नंबी नारायण या दोघांवरील प्रेम व्यक्त करत आहेत. दरम्यान, ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या नंबी नारायणन या अंतराळ शास्त्रज्ञाच्या कथेवर आधारित आहे.