मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रिया चक्रवर्तीला तब्बल दीड वर्षांनंतर स्वतःची बॅंक खाती वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. रियाने आपले बॅंक खाते डीफ्रीज करण्याची याचिका विशेष न्यायालयाने मंजूर केली आहे.
कोर्टाने सांगितले की, रियाचे अकाऊंट आणि फिक्सड डिपॉजिट डी- फ्रीज करण्याच्या याचिकेवर एनसीबीचा आक्षेप नाही. कारण रियाकडून लेखी अंडरटेकिंग घेण्यात आले आहे. रीया गरज पडल्यास अकाउंट बॅलेन्स उपलब्ध करेल. त्यानंतर अटी- शर्तींसह ही परवानगी देण्यात आली आहे, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशी दरम्यान रीया चक्रवर्तीची बॅंक खाती न्यायालयाने गोठवली होती. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बॅंक खात्यांचा ताबा मिळण्यासाठी रियाने न्यायालयात याचिका केली होती. बॅंक खात्यांसोबत फोन, मोबाईल वापराचीही परवानगी एनडीपीएस कोर्टाने दिली आहे.