मराठमोळी सुंदर आणि स्टनिंग अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरूची ओळख आहे. तिच्या अभिनयच तसेच तिची ड्रेसिंग स्टाईलने ती नेहमीच चर्चेत असते. यातच रिंकू राजगुरू पुन्हा एकदा फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. हा फोटोशूट तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोशूटची चाहत्यांनी भरभरून स्तुती केली आहे. या फोटोत तिने गुलाबी रंगाची भरजरी साडी परिधान केली आहे.
रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच केसात गजरा माळला आहे. साडीमधील अंदानी तिने चाहत्यांना घायाळ केले आहे. ज्यात ती अस्सल महाराष्ट्रीयन स्टाईल ड्रेसमध्ये दिसते. चाहत्यांच्या मते हा रिंकूचा आतापर्यतच बेस्ट लुक आहे.त्यामुळे अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. व्हिडीओमध्ये रिंकू अतिशय सुंदर दिसत आहे. तिला पाहून एका चाहत्याने चक्क लग्नाची मागणी घातली आहे. त्याने ‘माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे.. माझ्याशी लग्न करशील का?’ असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी रिंकूची ‘हंड्रेड’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजमधील अभिनयाने तिने अनेकांची मने जिंकली होती. यामध्ये तिने ‘नेत्रा पाटील’ ही भूमिका साकारली होती.