मराठमोळी सुंदर आणि स्टनिंग अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरूची ओळख आहे. तिच्या अभिनयच तसेच तिची ड्रेसिंग स्टाईलने ती नेहमीच चर्चेत असते. यातच रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या फोटोशूटमुळे नाही तर डिनर डेटच्या व्हायरल फोटोमुळे चर्चेत आली आहे. या स्टेटसमधूनच रिंकू आणि आकाशची ही मैत्री किंबहुना मैत्रीपेक्षाही खास नातं सर्वांसमोर आलं.
हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून आकाश ठोसर आहे. आकाशने सोशलवर रिंकुसोबतचा डिनर डेटला जातानाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरुन त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
View this post on Instagram
रिंकू राजगुरू सैराटनंतर ‘मेकअप’, ‘कागर’ या मराठी चित्रपटांमध्ये दिसली होती. तसेच तिने ‘१००’,’अनपॉज्ड’,’२०० हल्ला हो’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. त्यानंतर लवकरच आता ती ‘छुमंतर’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. आकाशने ‘लस्ट स्टोरीज’,’१९६२ द वॉर इन दी हिल्स’ या सीरिजमध्ये काम केले आहे.