नवी दिल्ली: दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणातील खटल्यांची सुनावणी करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने चार कोर्ट निश्चित केली आहेत. दोन सत्र न्यायालये आणि दोन न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयांमध्ये ही सुनावणी चालणार आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयांकडून त्या विषयीची अधिसूचना काल जारी करण्यात आली.दिल्लीत विधानसभा निवडणुकांच्या आधी मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली झाल्या होत्या. त्यात अनेक संशयितांवर दंगल भडकावल्याचे व हिंसाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुख्य महानगर न्याय दंडाधिकारी, महानगर न्यायदंडाधिकारी शहादरा, आणि शहादरा येथीलच दोन सत्र न्यायाधीश दर्जांच्या कोर्टांत या खटल्यांची सुनावणी विभागून दिली जाणार आहे. एकाच वेळी अनेक खटले यात दाखल झाल्याने एकूण चार कोर्टांमध्ये त्याच्या सुनावणीचे काम चालणार आहे.