नवी दिल्ली: महावीर चक्र विजेते माजी लेफ्टनंट जनरल राजमोहन व्होरा यांचे काल करोनामुळे निधन झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना करोना झाल्याचे निदान झाले होते.
प्रत्यक्ष युद्धभूमीत बजावलेल्या कार्याबद्दल लष्करातील कार्यरत जवान किंवा अधिकाऱ्यांना हा महावीर चक्र पुरस्कार दिला जातो. तो लष्करातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा किताब मानला जातो. त्यांना सन 1972 साली हा पुरस्कार मिळाला होता.
गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर स्टेंट बसवण्याचा उपचार केला जाणार होता. त्यातच त्यांना करोना झाल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.