सातारा, (प्रतिनिधी) – चित्रपट कथा, पटकथा लेखक नीलेश महिगावकर यांच्या ‘बाभळी कॉलींग’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीला वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. अल्पावधीत ही आवृत्ती संपल्याने इर्जिक प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन शुक्रवार, दि. 5 रोजी सायंकाळी 6 वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार आहे.
सुप्रसिध्द समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते व ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार असून यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, प्रख्यात वक्ते व अभ्यास प्रा. निरंजन फरांदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार विनोद कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून या समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन इर्जिक प्रकाशनचे संचालक हरिश्चंद्र भोसले, गिरीश पाटील, विठ्ठल भोसले, अल्पेश खरात यांनी केले आहे.