जाणून घ्या… नातं रणबीर आणि ऋषी कपूरचं

बॉलीवूडचा लाडका चॉकलेट हिरो राहिलेल्या ऋषी कपूर यांनी नुकतीच एक्‍झिट घेतली आणि त्यांच्या चाहत्यांसह अवघं सिनेविश्‍व हळहळलं. ऋषी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या अनेक आठवणींना यापुढे उजाळा दिला जात राहील.

विशेषतः, त्यांच्या “खुल्लम खुल्ला ः ऋषी कपूूर अनसेंसर्ड’ या आत्मचरित्रपर पुस्तकातील अनेक आठवणींचे स्मरण आता केले जात आहे. या पुस्तकामध्ये ऋषी कपूर यांनी अनेक खुलासे करतानाच आपला मुलगा रणबीर कपूर याच्यासोबत असलेल्या नात्याविषयीही भाष्य केलेलं आहे. ते जेव्हा न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरशी सुरू असलेली लढाई लढत होते तेव्हा त्या संपूर्ण संघर्षादरम्यान रणबीर एखाद्या ढालीप्रमाणे उभा राहिला.

या काळात रणबीर ऋषींच्या सर्वांत जवळ राहिला आणि ते अनेक गोष्टी त्याच्याशी शेअर करत होते. तथापि, त्यापूर्वी 2017 मध्ये आलेल्या या पुस्तकातही त्यांनी रणबीरच्या स्वभावाविषयी जे लिहिलं आहे त्यानुसार, रणबीर त्यांच्याशी फारसा खुलेपणाने बोलत नसे. त्याचा प्रामुख्याने ओढा आई नीतू कपूरकडे जास्त होता. तिच्याशी तो त्याच्या सर्व गोष्टी शेअर करत असे. पण कर्करोगाच्या व्याधीनं ग्रासल्यानंतर हाच रणबीर ऋषी यांचा सर्वांत जवळचा मित्र-सखा बनला!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.