Redmi 13C: Xiaomi आपला नवीन बजेट स्मार्टफोन Redmi 13C लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Xiaomi ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर Redmi 13C च्या लॉन्च तारखेची पुष्टी केली आहे. जर तुम्ही स्वस्त आणि मस्त नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल Redmi 13C चांगला पर्याय असेल. Xiaomi च्या अधिकृत पोस्टनुसार, Redmi 13C फोन 6 डिसेंबरला लॉन्च होईल.
Redmi 13C चे अधिकृत तपशील –
Xiaomi ने आगामी Redmi फोनबद्दल काही प्रमुख वैशिष्ट्ये उघड केली आहेत. हँडसेटचे तपशील आधीच mi.com/in वेबसाइटवर लाइव्ह आहेत. वेबसाइटनुसार, हँडसेट स्टारडस्ट ब्लॅक आणि स्टारशाइन ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 50MP AI कॅमेरा असल्याची पुष्टी देखील केली गेली आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल.
याशिवाय हँडसेटची काही छायाचित्रेही वेबसाइटवर उपलब्ध आहेत. त्यांच्या आधारे, हँडसेटमध्ये फ्लॅट डिझाइन आणि डिस्प्ले असणे अपेक्षित आहे. मागील बाजूस, दोन मोठे कॅमेरा हाऊसिंग आहेत, एक शीर्षस्थानी, तर दुसर्या हाऊसिंगमध्ये दोन कॅमेरा सेन्सर त्यांच्यासोबत जोडलेले आहेत.
Redmi 13C किंमत –
Redmi 12C ची किंमत 6,799 रुपयांपासून सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, आगामी Redmi 13C स्मार्टफोनकडून अशाच किंमतीची अपेक्षा आहे.