Upcoming Smartphone in December 2023 : डिसेंबरमध्ये भारतात, जागतिक स्तरावर आणि चीनमध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. काही स्मार्टफोन्स आधी चीनमध्ये लॉन्च केले जातील आणि नंतर भारतात येतील. आम्ही तुम्हाला सर्व स्मार्टफोन बद्दल सांगत आहोत.
Oneplus 12 : हा स्मार्टफोन चीनमध्ये 5 डिसेंबर रोजी लॉन्च होईल आणि नवीन वर्षात भारतात प्रवेश करेल. लीक्सवर विश्वास ठेवला तर, यात क्वालकॉम (Qualcomm) चा लेटेस्ट चिपसेट, स्नैपड्रैगन (Snapdragon) 8 Gen 3 SOC, 5400 एमएएच बॅटरी 100 Watt फास्ट चार्जिंगसह मिळू शकते. या फोनमध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंगचा सपोर्टही मिळेल.
Realme GT 5 Pro : हा स्मार्टफोन चीनमध्ये 7 डिसेंबरला लॉन्च होणार आहे. त्यानंतर हा फोन भारतात नवीन वर्षात लॉन्च होईल. यामध्ये तुम्हाला राउंड कॅमेरा मॉड्यूल, 5400 mAh बॅटरी, स्नैपड्रैगन (Snapdragon) 8 Gen 3 SOC आणि 4500 निट्स (nits) चा पीक ब्राइटनेस मिळू शकतो.
Infinix Smart 8 HD : या फोनमध्ये 6.6 इंच डिस्प्ले 90hz च्या रिफ्रेश रेटसह असेल. तुम्हाला स्मार्टफोनमध्ये मॅजिक रिंग फीचर मिळेल जे आयफोनच्या डायनॅमिक आइलैंड (Dynamic Island)सारखे आहे. हा मोबाईल फोन भारतात 8 डिसेंबरला लाँच होईल.
Redmi 13C : हा स्मार्टफोन 6 डिसेंबरला लाँच होईल. फोनमध्ये 6.74 इंच डिस्प्ले, MediaTek Helio G99 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी मिळू शकते.
Infinix Hot 40 : हा फोन 9 डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर लॉन्च केला जाईल ज्यामध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर आणि 50MP प्राइमरी कॅमेरा असेल.
IQOO 12 : याशिवाय 12 डिसेंबरला IQ भारतात IQOO 12 स्मार्टफोन लॉन्च करेल. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी, 50MP प्राइमरी कॅमेरा आणि Snapdragon 8 Gen 3 SOC चा सपोर्ट मिळेल.
तुम्हीही जर नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्याकडे स्मार्टफोनचे Oneplus 12,Realme GT 5 Pro,Infinix Smart 8 HD ,Redmi 13C,Infinix Hot 40, IQOO 12 हे वरील पर्याय आहेत. डिसेंबर महिन्यात हे स्मार्टफोन लाँच होणार आहेत.